कै लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर आणि कल्पना मलये याना जाहीर

4 एप्रिल मालवणी भाषा दिनी प्रदान

‘बोलीभाषा टीकायची गरज’ या विषयावर व्याख्यान

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कै. लक्ष्मण साबाजी पवार मालवणी साहित्य पुरस्कार विनय सौदागर यांच्या ‘सभोवताल’ या काव्यसंग्रहाला व कल्पना मळये यांच्या ‘कारटो’ या मालवणी साहित्यातील पहिल्या बालकादंबरीला जाहीर झाले आहेत. रोख रक्कम व मानपत्र असे याचे स्वरूप आहे.

4 एप्रिल 2023 ला मालवणी भाषा दिवसाचे औचित्य साधून या पूरस्कारांचे ऑनलाइन वितरण प्रसिद्ध भाषातज्ज्ञ व साहित्यिक डॉ रविंद्र शिवदे, नाशिक व डॉ चंद्रकांत पाटणकर, साहित्यिक व निवृत्त प्राध्यापक, केइम हॉस्पिटल यांच्या हस्ते केले जाईल. यानिमित्ताने ‘ बोलीभाषा टिकवण्याची गरज’ या विषयावर डॉ शिवदे यांचे भाषण होईल. डॉ शिवदे अनेक भाषांत पारंगत असून भगवान बुद्धाचे धम्मपद त्यांनी पाली भाषेतून उर्दूत शायरीमध्ये लिहिले आहे.

4 एप्रिल हा मच्छीन्द्र कांबळी यांचा जन्मदिन दिवस म्हणून साजरा केला जातो.

कणकवली / सीतराज परब

error: Content is protected !!