कुडाळ येथे होणार “कोकण नाऊ महोत्सव २०२३” चे भव्य आयोजन-विशाल सेवा फौंडेशन चे अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्थे उदघाट्न

२ एप्रिल ते ११ एप्रिल पर्यंत कुडाळ शहर गजबजणार.

कुडाळ शहरात प्रथमच फन फेअर,फूड फेस्टिवल,क्रीडा स्पर्धा,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो आणि विविध सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

कुडाळ हायस्कूल मैदानावर होतोय “कोकण नाऊ महोत्सव २०२३”

कुडाळ : कोकण नाऊ चॅनल आयोजित “कोकण नाऊ महोत्सव २०२३” चे आयोजन कुडाळ येथील “कुडाळ हायस्कूल मैदान” येथे दिनांक २ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीमध्ये करण्यात आलेले आहे.कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय,शैक्षणिक उपक्रम राबवले जातात आणि याच धर्तीवर या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे.
🛑यामध्ये खालील कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आले आहे……

दिनांक 2 एप्रिल रोजी शिल्पा यतीन खोत यांचे स्वराज्य संघटना ढोल पथक मालवण यांचं ढोल वादन तसेच विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब तसेच विविध मान्यवरांच्या हस्थे भव्य उद्घाटन आणि सायंकाळी सात वाजता आमने-सामने डबलबारी यामध्ये बुवा “प्रथमेश चव्हाण आणि बुवा अखिलेश फाळके”. दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडरआर्म प्रीमियर लीग 2023 भव्य बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा (पहिला दिवस). दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडरग्राउंड प्रीमियर लीग 2023 (दुसरा दिवस). दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी कोकण नाऊ अंडर आर्म प्रीमियर लीग 2023 (तिसरा दिवस). दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी हनुमंत जयंती निमित्त “आमने-सामने डबलबारी”यामध्ये बुवा गुंडू सावंत विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर.दिनांक 07 एप्रिल 2023 रोजी श्रीदेवी यक्षणी दशावतार नाट्यमंडळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोग “श्वेतवान मणिपाल”. दिनांक 8 एप्रिल 2023 “खेळ पैठणीचा” (नाव नोंदणीसाठी संपर्क 9370440893).दिनांक 9 एप्रिल 2023 बाळकृष्ण दशावतार नाट्य मंडळ यांचा दशावतारी नाट्यप्रयोग “दैव जाणिले कोणी”. दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी गायन स्पर्धा आणि या गायन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क 8408929923 तसेच 9370440893. यादिवशीच विशेष आकर्षण गायक ध्रुव विजयकुमार गोसावी यांचा “संगीत रजनी”. दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी “भव्य सांस्कृतिक कार्यक्रम”. कोकण नाऊ महोत्सव 2023 या महोत्सवामध्ये अशाप्रकारे विविध सांस्कृतिक,धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांच,भव्य आयोजन करण्यात आलेला आहे तसेच फनफेअरच्या माध्यमातून आणि रोबोटिक ॲनिमल यांच्या माध्यमातून लहान मुलांचं विशेष मनोरंजन देखील यामध्ये होणार आहे.त्यामुळे कोकण नाऊ महोत्सव 2023 चा आपण सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कोकण नाऊ टीम कडून करण्यात येत आहे.

मयूर ठाकूर / कोकण नाऊ / कुडाळ

error: Content is protected !!