मधली कुंभारवाडी येथील कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या वतीने मदत
माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केली मदत
कुडाळ : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील भाजपा कार्यकर्ते कै. अभी तळवडेकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी सरपंच प्रशांत राणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक गणेश भोगटे, अभिषेक गावडे, निलेश परब, बुथ अध्यक्ष दशरथ कुंभार, बाबू तळवडेकर यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ