कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते आनंद पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ईस्टेट एजंट आनंद पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्तरातून आनंद पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. आनंद पारकर हे कणकवली शहरातील सर्वपरिचित असे नाव असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इस्टेट एजंट क्षेत्रात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे. त्यांचा आज वाढदिवस कणकवलीत साजरा करत असताना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गवाणकर हार्डवेअर चे मालक गौरव गवाणकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचे राजू गवाणकर, महेश नार्वेकर, रवींद्र बाणे आदी उपस्थित होते. विविध स्तरातून आनंद पारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!