शीडवणे येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार सुरु..

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला शिडवणे येथे सुरुवात झाली असून शिडवणे गावांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचे योग्य नियोजन करण्यात आले आहे गावांमध्ये घरोघरी प्रचार करण्यास सुरुवात झाली आहे. शिडवणे येथील लोकांचा नारायण राणे यांच्या प्रचाराला प्रचंड प्रतिसाद मिळतं असल्याचे सांगण्यात येतं आहे. भाजपा चे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन नारायण राणे यांचा प्रचार करत आहेत.
यावेळी शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, उपसरपंच दीपक पाटणकर, बूथ प्रमुख महेंद्र टक्के,अनिल पांचाळ याच्यासह
सर्व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!