आमदार नितेशजी राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा

वेंगुर्ला – आमदार नितेशजी राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला . मोदी सरकारचे विविध योजनांचे लाभार्थीपर्यंत पोहोचून पुन्हा एकवार मोदी सरकार येण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे साहेबांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी , असे आवाहन केले .
यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महीला तालुकाध्यक्षा सुजाता पडवळ , माजी सभापती सारीका काळसेकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल व दादा केळुसकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , ता.उपाध्यक्ष प्रितेश राऊळ , मा.नगराध्यक्ष प्रसंन्ना कुबल , मा.उपनगराध्यक्ष अभि वेंगुर्लेकर , मनवेल फर्नांडिस , पपु परब , सायमन आल्मेडा , कॄपा मोंडकर , आकांक्षा परब , सुजाता देसाई , रसीका मठकर , हसीनाबेन मकानदार , रविंद्र शिरसाठ , जयंत मोंडकर , कमलेश गावडे , अजित कनयाळ्कर , अमेय धुरी , हितेश धुरी , भुषण आंगचेकर , भुषण सारंग , पुंडलिक हळदणकर , गणेश गावडे , प्रमोद वेर्णेकर , बंटी गावडे , प्रशांत बोवलेकर , नारायण कुंभार , मनोहर तांडेल , हेमंत गावडे , नामदेव सरमळकर , मारुती दोडशानट्टी , गौरव खानोलकर तसेच शहरातील अनेक पदाधिकारी , बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते .