दर तीन महिन्यांनी होणाऱ्या मेगा आरोग्य तपासणी शिबिराचे उद्या ओरोस येथे आयोजन

नागरिकांना लाभ घेण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दर तीन महिन्यांनी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्ह्यात केले जात आहे. कणकवली आणि सावंतवाडी येथील यशस्वी आयोजनानंतर उद्या दि. 08 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ओरोस येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उपलब्ध विशेष तज्ज्ञ सेवा :

  • कार्डिओलॉजिस्ट
  • कार्डिअॅक सर्जन
  • न्यूरो सर्जन
  • प्लास्टिक सर्जन
  • ऑन्को सर्जन (कर्करोग तज्ज्ञ)
  • युरो सर्जन
  • जनरल सर्जन
  • अस्थिरोग तज्ज्ञ
  • नेत्ररोग तज्ज्ञ
  • डेंटल सर्जन
  • हृदयरोग व मधुमेहरोग तज्ज्ञ
  • फुफ्फुसरोग तज्ज्ञ
  • मानसोपचार तज्ज्ञ
  • बालरोग तज्ज्ञ
  • स्त्रीरोग तज्ज्ञ

मोफत तपासण्या :

  • ब्लड प्रेशर तपासणी
  • ब्लड शुगर तपासणी
  • एक्स-रे
  • सीटी स्कॅन
  • सोनोग्राफी
  • हृदयाची 2D इको तपासणी
  • ईसीजी
  • प्रयोगशाळा रक्त तपासणी
  • शालेय मुलांची आरोग्य तपासणी

शिबिराच्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत कार्ड, वयवंदना कार्ड व आभा (ABHA) कार्ड सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

स्थळ : बाह्यरुग्ण विभाग (OPD), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग

दिनांक : शनिवार, दि. 08 ऑगस्ट 2026
वेळ : सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत

जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनीही केले आहे.

error: Content is protected !!