कणकवली तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी अजित सावंत यांची निवड
उपाध्यक्षपदी दिगंबर वालावलकर,अनिकेत उचले
तर सचिवपदी माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे
कणकवली पत्रकार समिती च्या कार्यकारणी निवडीकरिता आज कणकवली शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या विशेष सभेमध्ये झालेल्या निवडणुकीत दैनिक पुढारी चे पत्रकार अजित सावंत यांची बहुमताने निवड करण्यात आली श्री. सावंत यांना 31 मते मिळाली त्यानंतर उर्वरित संपूर्ण कार्यकारणीची निवड बिनविरोध करण्यात आली. पत्रकार भगवान लोके व अजित सावंत यांच्यामध्ये अध्यक्ष पदाकरिता निवडणूक झाली. यात श्री. सावंत हे विजयी ठरले. उर्वरित कार्यकारणी मध्ये सचिव – माणिक सावंत,
उपाध्यक्ष – दिगंबर वालावलकर,अनिकेत उचले, सहसचिव – उत्तम सावंत, खजिनदार – योगेश गोडवे, कार्यकारणी सदस्य –
भास्कर रासम, अस्मिता गिडाळे, किशोर राणे, उमेश बुचडे, तुषार हजारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणूक प्रक्रिये करिता निरीक्षक म्हणून देवयानी वरसकर, बाळा खडपकर, प्रकाश काळे यांनी काम पाहिले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे निरीक्षकांसह जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरोसकर, व उपाध्यक्ष रमेश जोगळे माजी अध्यक्ष गणेश जेठे,संतोष वायंगणकर, संतोष राऊळ यांच्यासह अन्य सर्व पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली