“कोकण नाऊ महोत्सव 2023” चे अखेरचे दोन दिवस.

“कुडाळ हायस्कूल मैदानावर” सुरु आहे कोकण नाऊ महोत्सव 2023.

आज रंगणार “आवाज सिंधुदुर्ग” चा ही गायन स्पर्धा आणि बालगायक ध्रुव विजयकुमार गोसावी यांची संगीत रजनी.

फूड फेस्टिवल,फन फेअर,गृहपयोगी वस्तूंची खरेदी,भारतातील क्रमांक एकचा एंटरटेनमेंट शो चा कुडाळ वासियांनी आनंद घ्यावा.

कुडाळ “कोकण नाऊ महोत्सव 2023” गेले 8 दिवस कुडाळ हायस्कूल मैदान, कुडाळ. येथे सुरु आहे. या महोत्सवात फूड फेस्टिवल, तसेच फन फेअर, ग्रुहपयोगी वस्तू प्रदर्शने, रोबोटीक प्राणी पक्षी प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. आज दिनांक 10 एप्रिल आणि उद्या दिनांक 11 एप्रिल हे दोन दिवस यां महोत्सवाचे शेवटचे दोन दिवस असून, “आवाज सिंधुदुर्गचा ” गायन स्पर्धा, जादूचे प्रयोग, नृत्यविष्कार, संगीत रजनी असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व कुडाळ वासियांनी या कार्यक्रमांचा आणि महोत्सवाचा लाभ घ्यावा

कुडाळ/मयुर ठाकूर.

error: Content is protected !!