कणकवली मराठा मंडळ कडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ

कणकवली नगराध्यक्षांच्या माध्यमातून शहर विकासाचा झंझावात सुरू

उर्वरित कामे देखील लवकरच पूर्णत्वास नेण्याची नगराध्यक्षांची ग्वाही

कणकवली शहरातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर झाली असून, यातीलच एक मंजुरी असलेला कणकवली महामार्ग ते नेहरूनगर मराठा मंडळ पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक पांडुरंग परब यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली शहरातील अनेक रस्त्यांची डांबरीकरणं करण्याच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांनी या कामांकरिता निधी आणला असून, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. नेहरूनगर मधील या कामाबद्दल नेहरूनगर वासियांमधून देखील यावेळी समाधान व्यक्त करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, संजय मालांडकर, राजन परब, संजय ठाकूर, मनोज हिर्लेकर, कल्याण पारकर आदि उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!