अतिक्रमण हटाव मोहिमे दरम्यान रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

आरओडब्ल्यू मधील बांधकामे हटवण्याची मागणी

पोलिसांकडून कारवाईचा इशारा

गेले दोन दिवस कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतलेली असतानाच आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली बस स्थानक स्थानकासमोरील एका स्टॉल धारकांने चक्क कॅनमधून रॉकेल अंगावर ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील बाका प्रसंग टळला. दरम्यान याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर स्टॉलधारक हा कलमठ हद्दीमध्ये व्यवसाय करतो. कणकवली ब्रिज खाली बस स्थानकासमोर या व्यावसायिकाने आपला स्टॉल लावलेला होता. आज दुपारी या कारवाई दरम्यान सदर या व्यवसायिकाने कॅन मधून रॉकेल आणून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यावेळी पोलिसांनी प्रसंगसावधान राखून रॉकेलचे कॅन काढून घेतले. तसेच कारवाईचा इशारा दिला. मात्र या आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ ने जर आम्हा गोरगरीब व्यवसायिकांवर कारवाई करता. मग आर ओ डब्ल्यू मधील दुकानदारांवर देखील कारवाई करा अशी मागणी केली. त्यामुळे स्टॉल धारक व आर ओ डब्ल्यू मधील दुकानदार असा संघर्ष येत्या काळात रंगण्याची शक्यता आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!