राणेंच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ठाकरे नव्हेत, शिवसैनिकच पुरेशे!

हिम्मत असेल तर राणे व त्यांच्या बगलबच्चानी ठाकरेंच्या सभास्थळी येऊन दाखवावे
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे राणेंना प्रती आव्हान
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा 3 मे रोजी कणकवलीत घेण्यात येणार आहे. व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरापासून पाचशे मीटरवर ही सभा होणार आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धमकी देणारे राणे हे सभास्थळी त्यांच्या बगलबच्चांसह चालतही येऊ शकतात. राणेंच्या आव्हानाला आम्ही प्रति आव्हान देत असून राणेंनी उत्तर द्यायला ठाकरेंची गरज नाही शिवसैनिकच पुरेसे आहेत.हिम्मत असेल तर शिवसैनिक तिथे उभे आहेत. हिम्मत असेल तर राणीने सभास्थळी येऊन ठाकरेंना अडवून दाखवावे असे प्रति आव्हान युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले.
कणकवलीत पत्रकारांशी नाईक बोलत होते. यावेळी ते म्हणाले, आम्ही 3 तारीख ला राणेंची ठाकरेंच्या सभास्थळी वाट पाहतोय. राणेंनी आपल्या बगलबच्चांसह तिथे येऊन दाखवावे. राणेंनी मतदार संघातील जनताच आता 7 जूनला परतीचा मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा देखील दिला. आमचे उमेदवार विनायक राऊत यांचा नाव पहिल्याच यादीत उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. गेले दोन महिने विनायक राऊत यांची प्रचार यंत्रणा आम्ही राबवत असून खळा बैठका व अन्य सभांच्या माध्यमातून 200 हून अधिक सभा घेण्यात आल्या. घराघरात मशाल चिन्ह पोचवण्याचे काम शिवसैनिक व महायुतीचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते सध्या करत आहेत. त्यामुळे विनायक राऊतांचा विजय हा अडीच लाखाहून अधिकच्या मताधिक्याने होणार असल्याचा दावा सुशांत नाईक यांनी केला.
दिगंबर वालावलकर /कणकवली